अमोल मिटकरी सरकार विरोधात राज्यपालांकडे काय करणार मागणी?
त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तसेच 11 श्रीसदस्यांचा मृत्यूला हे सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात केला
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी खारघर येथे राज्यातील अनेक मान्यवर आणि राजकीय नेते पोहचले होते. तर 7 ते 8 लाख श्रीसदस्यही जमले होते. यावेळी मान्यवरांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली होती. मात्र श्रीसदस्यांना उन्हात बसावं लागलं होतं. या सोहळ्यात उष्मघातामुळे 11 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तसेच 11 श्रीसदस्यांचा मृत्यूला हे सरकारच जबाबदार असल्याचा घणाघात केला. तर याप्रकरणी आपण थेट राज्यपाल यांच्याकडे तक्रार करणार, त्यांना पत्र लिहून याची माहिती देणार आहे. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा राज्य शासनाचा असल्याने राज्य शासनच या मृत्युस जबाबदार आहे. त्यामुळे राज्य शासनावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.