शाह हे धाराशिव आणि नागपूरमध्ये ‘ते’ बॅनर बघायला येत असतील; राऊतांची खोचक टीका
याच्याआधी अमित शाह हे दोन आठवड्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या सोहळ्यासाठी आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन दिवस नागपूर दौऱ्यावर येत असल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याचे संकेत मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत. याच्याआधी दोन आठवड्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या सोहळ्यासाठी आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन दिवस नागपूर दौऱ्यावर येत असल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. याच्याआधी देखिल अमित शाह यांच्या दौऱ्यावरून त्यांनी टीका केली होती. त्यांनी शाह हे महाविकास आघाडीची नागपुरातील सभेवर लक्ष ठेवण्यासाठी, सभा एन्जॉय करण्यासाठी येत असल्याची टीका केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा राऊत यांनी नागपूर आणि धाराशिव येथे लागलेल्या भावी मुख्यमंत्री पोस्टर्सवरून शाह यांच्यावर निशाना साधला आहे. शाह हे अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यात कोणाचे जोरदार पोस्टर्स लागले आहेत हे पाहण्यासाठी येत असल्याचा टोला लगावला आहे.