उसणं अवसान आणून बोलणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही; शिवसेना नेत्याची राऊत यांच्यावर टीका

| Updated on: Apr 16, 2023 | 12:34 PM

संजय राऊत हे भाजप टीका करतना राष्ट्रवादीला संपवण्याचे कान भाजप करत असल्याचे म्हटलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना देसाई म्हणाले, त्यांना टीका करण्याशिवाय काय कळतं का? टीका करण्याशिवाय काय सुचतं का असा सवाल केला आहे

खारघर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थित आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ (Maharashtra Bhushan Award Ceremony) पार पडत आहे. यावेळी निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या मंत्री मंडळातील अनेक मंत्री या कार्यक्रम स्थळी हजर आहेत. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर खरमरीत उत्तर दिल आहे. संजय राऊत हे भाजप टीका करतना राष्ट्रवादीला संपवण्याचे कान भाजप करत असल्याचे म्हटलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना देसाई म्हणाले, त्यांना टीका करण्याशिवाय काय कळतं का? टीका करण्याशिवाय काय सुचतं का असा सवाल केला आहे. तर ते सकाळी येतात टीका करतात आणि निघून जातात. त्यांनी अवकाळीवर देखिल अशीच टीका केली होती. मात्र आता पंचनामे झाले आहेत. मदत ही घोषित होईल. पण त्यांच्या पायाला मातीतर लागली आहे का? आम्ही लोकांना अडचणीतनं बाहेर काढणारे, अडचणीत लोकांसाठी मदतीला जाणारी मंडळी आहोत. तर उसणे अवसान आणून बोलणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही, अशी टीका केली आहे.

Published on: Apr 16, 2023 12:34 PM
वज्रमूठ सभेला काँग्रेस नेत्याची गैर हजेरी, काय आहे भंडाऱ्याला जाण्याचे कारण? कोण आहे नेता?
राष्ट्रवादीत अजित पवार नाराज? नागपुरच्या वज्रमूठ सभेपूर्वी स्पष्टच म्हणाले…