समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातावर नितीन गडकरी यांच्याकडून शोक व्यक्त
आजही येथे लोकार्पणनंतर आतापर्यंतचा सगळ्यात भयंकर अपघात झाला आहे. ज्यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा भयंकर अपघात सिंदखेडराजानजीक घडला.
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र अद्यापही थांबलेलं अथवा कमी झालेलं नाही. आजही येथे लोकार्पणनंतर आतापर्यंतचा सगळ्यात भयंकर अपघात झाला आहे. ज्यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा भयंकर अपघात सिंदखेडराजानजीक घडला. या अपघातावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करत, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व दु:खद आहे. अपघातातील मृतांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य मिळावे अशी प्रार्थना करतो. ईश्वर दिवंगतांना शांती प्रदान करो. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबीयांसोबत आहेत असे त्यांनी म्हटलं आहे.
Published on: Jul 01, 2023 11:48 AM