‘सरकार म्हणजे विषकन्यासारखा’, नितीन गडकरी यांचं रोखठोक वक्तव्य
यावेळीही त्यांनी सरकारबद्दल थेट वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेतच त्याचबरोबर गडकरी असे का म्हणाले असा सवालही अनेकांना पडला आहे.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या स्पष्ट आणि रोखठोक भूमिकेमुळे ओळखले जातात. ते जे आहे ते बोलून जातात. यावेळीही त्यांनी सरकारबद्दल थेट वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेतच त्याचबरोबर गडकरी असे का म्हणाले असा सवालही अनेकांना पडला आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात गडकरी यांनी सरकारचा हस्तक्षेप, सरकारचा सहभाग आणि सरकारची छाया देखील ज्या प्रकल्पावर पडते, तो प्रकल्प नष्ट होतो. म्हणून सरकार म्हणजे विषकन्यासारखा असतं असं आपलं त्यांनी मत मांडलं आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांनी सरकारपासून जो दूर राहील तो प्रगती करू शकतो असंही म्हटलं आहे. त्याचबरोबरव यावेळी गडकरी यांनी, आपल्यासमोर सगळ्यात मोठे टार्गेट हे देशाच्या कृषी क्षेत्राचं उत्पन्न 22 टक्क्यापर्यंत वाढविण्याचे असल्याचे सांगितलं. तर ज्या दिवशी नेऊ त्या दिवशी शेतकऱ्यांची मजुरी पंधराशे रुपये होईल असेही ते म्हणाले. तर देव आणि सरकार या दोघांवर आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा या थेरीचा समर्थक असल्याचेही गडकरी म्हणाले.