Bhagwat Karad | ‘मला लोकांची सेवा करायला आवडतं’-tv9
डॉ. कराड यांनी आपल्याला मला लोकांची सेवा करायला आवडतं असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन योग्य नसल्याचेही म्हटलं आहे.
मुंबई : सध्या राज्यात अनेक आंदोनले होत आहेत. तर अनेक ठिकाणी राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. यावेळी प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहचावी म्हणून पत्रकार हे प्रयत्न करत असतात. त्यांना खरा सपोर्ट करतात ते व्हिडीओ जर्नालिस्ट आणि फोटोग्राफर. ते कोणताही क्षण चुकू नये म्हणून काम करत असतात. असेच काम करत असताना एका कॅमेरामन (Photographer) खाली कोसळला आणि त्यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) हे देवदुताप्रमाणे धावून आल्याचा दिसून आले आहे. डॉ. भागवत कराड यांनी त्याच वेळी कार्यक्रम थांबवला आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार (First Aid) केले. त्यावरून त्यांचे कौतूक होत आहे. यावर डॉ. कराड यांनी आपल्याला मला लोकांची सेवा करायला आवडतं असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन योग्य नसल्याचेही म्हटलं आहे.
Published on: Jun 17, 2022 08:44 PM