Ramdas Athawale : त्यांच्या एकत्र येण्याणे फार परिणाम होणार नाही, आमची ताकद मोठी आहे – रामदार अठवले
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरिही तसा परिणाम आमच्यावर होणार नाही. आमची ताकद मोठी आहे.
काही दिवसापांसून उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यात बैठक झाली. आणि वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यात झाली. यानंतर या युतीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
यावेळी आठवले यांनी, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर हे एकत्र आल्याने फार परिणाम होणार नाही असं म्हटलं आहे. त्याचबरोबर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचेही म्हणता येणार नाही. कारण भीमशक्ती ही आपल्याबरोबर असल्याचेही आठवले म्हणाले.
भीमशक्ती आपल्याबरोबर असून वंचित ही बाळासाहेबांबरोबर आहेत. तर जागा वाटपावरून शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये जमणार नाही. त्यामुळे जागावाटपावरून त्यांच्यात वितुष्ट येईल. तरिही ते एकत्र आले तर तसा परिणाम आमच्यावर होणार नाही. आमची ताकद मोठी आहे.