Kolhapur Panchganga Protest | कोल्हापूरकरांचं अनोखं आंदोलन, सिलिंडर पंचगंगेत टाकून आंदोलन
कोल्हापूर शहर नागरी कृती समितीनं वाढलेल्या गॅस सिंलेडर दराविरोधात आवाज उठवत केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच गॅस सिंलेडर मोकळ्या टाक्या पंचगंगा नदीत फेकून अनोखे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर हजर होता. दरम्यान असेच अंदोलन शिवसेनेकडूही करण्यात आलं. यावेळी रिकामे सिलेंडर डोक्यावर घेऊन महागाईचा निषेध करण्यात आला.
कोल्हापूर : कोरोनामुळे (Corona) घाईला आलेल्या अर्थव्यवस्थेमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. तर ज्यांना मिळाल्या त्या तटपंज्या पगारावर आपले आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यातच आता वाढणाऱ्या राज्यातील महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. यातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असून सर्वसामान्यांनी गाड्या वापरायच्या की नाही असाच सवाल विचारला जात आहे. तर वाढत्या महागाईने गृहणींना अडचणीत आनले आहे. त्यातच आता घरगुती गॅस सिंलेडर (Gas Cylinder) महाग झाल्याने आता काय करायचं असाच प्रश्न त्यांच्यासमोर आवाचून उभा झाला आहे. वाढणाऱ्या या महागाई आणि वाढलेल्या घरगुती गॅस सिंलेडरच्या दरवाढविरोधात कोल्हापूरात आवाज उठविण्यात आला. तसेच गॅस सिंलेडरच्या टाक्या पंचगंगा नदीत फेकून आनोखे आंदोलन करण्यात आले आहे. तर केंद्र सरकारविरोधात (Central Government) घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे कोल्हापूरात केलेल्या या आंदोलनाचा राज्याच चर्चेचा विषय बनला आहे.