राज्यातल्या या भागाला वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपले; अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान, बळीराजाला चिंतेचं ग्रहण
या बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीतील पिकांवर होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यात गेली चार दिवस पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरूच आहे.
मुंबई : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. कुठे पाऊस पडत आहे. तर, कुठे गारपिटीचा फटका बसत आहे. यातच उन्हाची तीव्रताही (Intensity of summer) वाढत चालली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीतील पिकांवर होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यात गेली चार दिवस पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे रब्बी पीकाचं (rabi crop) मोठं नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीमुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असता तरी शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुले शेतकरी हवाल दिल झाला आहे.
Published on: Apr 29, 2023 09:08 AM