आता काय करावं बळीराजानं? उपमुख्यमंत्र्यांचा जिल्हाच वगळला; शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू, चना, संत्रा, मोसंबीसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते
नागपूर : मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील नागपुरसह अनेक जिल्ह्यांना झोडपले. अवकाळी पाऊस व गारपिटीनेमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास निर्गाने हिरावला. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. गहू, चना, संत्रा, मोसंबीसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. तर नुकसानीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला राज्य शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. पण आता एक धक्का दायक बाब समोर आली असून यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हाच वगळण्यात आला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नुकसानीच्या मदतीतून नागपूर जिल्हा वगळण्यात आला आहे. यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
Published on: Apr 13, 2023 09:53 AM