‘सरकारने तोडगा काढावा, त्वरीत पंचनामे करावे’, अनिल देशमुख यांची मागणी
देशमुख यांनी, नागपुरसह विदर्भामध्ये आणि काही भागात गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे झाले पाहिजे असे म्हटलं आहे.
मुंबई : राज्यात एका वर्षात दोन वेळा अवकाळीने तडाखा दिल्याने शेतकरी हा हवालदिल झाला आहे. तर मागील दोन दिवसांपासून विदर्भाला अवकाळीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यांत झालेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे शेकडो हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. तर संत्रा आणि मोसंबी फळपिकाचे ही अतोनात नुकसान झाले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देशमुख यांनी, नागपुरसह विदर्भामध्ये आणि काही भागात गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे झाले पाहिजे. मात्र तलाठ्यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे पंचनामे रखडणार आहेत. त्यामुळे सरकारने यंत्रणा कामाला लावली पाहिजे. लवकरात लवकर पंचनामे व्हावेत अशी मागणी केली आहे. तर संत्रा आणि मोसंबीला मदत मिळू शकली नव्हती. ती आणि आत्ताच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर झाले पाहिजेत अशी मागणी केली आहे.