शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही; अवकाळी, गारपिटीवरून सरकारवर खडसेंचा निशाना

| Updated on: Apr 17, 2023 | 8:47 AM

यामुद्द्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्यात तीन वेळा अवकाळी पाऊस गारपीट मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाला आहे

जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीसह गारपिटी झाल्याने अनेक शेतकरी संकटात सापडलेले आहेत. अनेक ठिकाणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटी देत नुकसानीची पाहणी केली आहे. तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री लक्ष घालून आहेत. मात्र अजूनही नुसकान भरपाई मिळालेली नाही. यामुद्द्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्यात तीन वेळा अवकाळी पाऊस गारपीट मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाला आहे. मात्र अजून पर्यंत शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही. जनावरे मरण पावले आहेत. त्यांचेही पंचनामे अजून पर्यंत पूर्ण झालेले नाहीत. या सरकारने पंचनामे पूर्ण करावेत आणि तात्काळ मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Apr 17, 2023 08:47 AM
आठ, आठ, लोक मरत असतील तर सद्गुरु संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही; अमोल मिटकारी यांचा सरकारवर हल्लाबोल
‘मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फॅन’, हा नेता शिवसेनेच्या वाटेवर?