अवकाळीनंतर आता उन्हाचा चटका

| Updated on: Mar 21, 2023 | 8:58 AM

अवकाळी पाठोपाठ उष्णतेच्या लाटेचं संकट राज्यावर आटळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे

मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झालीय. यामुळे राज्यात गारवा अनुभवायला मिळत होता. पण आता दुसरे संकट राज्यावर येऊ शकते. अवकाळी पाठोपाठ उष्णतेच्या लाटेचं संकट राज्यावर आटळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि मुंबईमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे तीन दिवस पारा वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं अवाहन भारतीय हवामान विभागाने केलं आहे

Published on: Mar 21, 2023 08:58 AM
MahaFast News 100 | संप मिटला, कर्मचारी कामावरून हजर होणार
मुंबईत उन्हाच्या काहिलीनंतर बरसल्या अवकाळीच्या धारा