उष्णतेची लाट, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मंत्रालयात बैठक

| Updated on: Apr 24, 2023 | 9:54 AM

दरम्यान काही दिवस आधी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने 12 जणांचा बळी गेला होता. तर नाशिकमध्ये एका ट्रेनी जवानाचा उष्माघाताने मृत्यू झाला होता.

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात अवकाली पावसासह गारपीट होताना दिसत आहे. यानंतर आता राज्यावर उष्णनेची लाट आणि पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. त्याचअनुशंगाने सरकार आला अलर्टमोडव आले आहे. यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काय उपाय योजना करता येतील हे पाहण्यासाठी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. सरकारने राज्यातील पुढची परिस्थिती पाहता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान काही दिवस आधी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने 12 जणांचा बळी गेला होता. तर नाशिकमध्ये एका ट्रेनी जवानाचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. तर अनेक जिल्ह्यात मे महिना येण्याआधीच पाण्याची भिषणता जाणवू लागली आहे. त्यामुले ही बैठक बोलावण्यात आली आहे.

Published on: Apr 24, 2023 09:37 AM
नाणारनंतर आता बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध? तगडा पोलिस बंदोबस्त; पुन्हा सर्व्हे
बळीराजा पुन्हा संकटात सापडणार? राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील ५ दिवस अवकाळीचा इशारा