नाशिकच्या शेतकऱ्यांची अवकाळी काही पाठ सोडेना, उभी पिके आडवी, बळीराजाचं अतोनात नुकसान
नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली आहेत. अनेक भागांमध्ये तर जोरदार गारपीटही झाली आहे.
नाशिक : महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा हैदोस सुरूच आहे. अवघ्या दीड महिन्यापूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सहन पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची काही पाठ सोडेना अशीच गत झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली आहेत. अनेक भागांमध्ये तर जोरदार गारपीटही झाली आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या भागांमध्ये द्राक्ष, कांदे, भाजीपाला यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळते न मिळते तोच पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे .
Published on: Apr 29, 2023 10:07 AM