पुन्हा अवकाळीचा धुमाकूळ ; पुढील 48 तासांत अवकाळी पावसाचा अंदाज
याचदरम्यान आता पुढील 48 तासात मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांत पुन्हा पावसाची शक्यता असून येथे अलर्ट जारी करण्यात आला आहे
मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळीने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक पिंकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आता पुढील 48 तासात मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांत पुन्हा पावसाची शक्यता असून येथे अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात वीजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेल्या आंबा, काजू आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 08, 2023 08:28 AM