कधी थांबणार ही परवड; अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्याचा आक्रोश

| Updated on: Apr 16, 2023 | 9:04 AM

आलेल्या आस्मानी संकंटामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पार कोलमडला आहे. याचेच विदारक चित्र आज इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात पहायला मिळाले. अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकऱ्याने टाहो फोडला आहे

नाशिक : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील बेळगाव, तऱ्हाळे, धामणी पिंपळगाव, मोर धामणगाव, साकूर टाकेद परिसरात अवकाळी पावसाबरोबर जोरदार गारपीट झाली. तर विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी शेतात गारांचा खच पडला असून यामुळे बळीराजा पुरता हैराण झाला आहे. भाजीपाला, गहू, मका, जणांवराचा चारा इत्यादींचे नुकसान झाले आहे. या आलेल्या आस्मानी संकंटामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पार कोलमडला आहे. याचेच विदारक चित्र आज इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात पहायला मिळाले. अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकऱ्याने टाहो फोडला आहे. सध्या हा व्हिडिओ समोर आला असून तेथे किती नुकसान झाले असेल याचा किमान अंदाज बांधनेही कठीण झाले आहे.

Published on: Apr 16, 2023 08:38 AM
Special Report | अमोल कोल्हे यांच्या मनात ‘कमळ’? ‘भाजप’शी जवळीक वाढली? स्पष्टच म्हणाले…
अजित पवार युतीत सहभागी होणार? गुलाबराव पाटील यांनी तिथी सांगितली…