कृषीमंत्री अब्दुल सत्तार याचं अवकाळी पावसावर वक्तव्य; म्हणाले, …मात्र मी मंत्री झाल्यापासून…

| Updated on: May 15, 2023 | 2:39 PM

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक विधान केलं आहे. ज्याची त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सत्तार हे IMC कृषी परिषदेत बोलत होते.

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गाटपीट झाल्याने शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेल्या घास अवकाळीने हिरावून नेल्याने बळीराजाला अश्रू अनावर झाले आहेत. तर सरकारने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी, शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अशातच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एक विधान केलं आहे. ज्याची त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सत्तार हे IMC कृषी परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी, मी पहिला असा कृषिमंत्री आहे, जेव्हापासून मंत्री झालोय तेव्हापासून फक्त पाऊसच पडतोय. सतत पाऊस लागत आहे. पहिला पाऊस फक्त चार महिने होत असायचा. मात्र या टायमाला सात महिने झाले तरी पाऊस पडतोय असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाची सध्या चर्चा होत असतानाच मंत्री गुलाबराव पाटील याच्या नावाची देखील चर्चा होत आहे. त्यांनी देखिल, याच्याआधी सरकार आल्यापासून आम्ही पंचनाम्यांमध्येच गुंग आहोत. मागचे अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो. इकडे आल्यानंतर ब्रेक के बाद गारपीट सुरु आहे. लोकच काय देवही विस्कळीत असल्याची अस्वस्थता असल्याचे मत व्यक्त केलं होतं.

Published on: May 15, 2023 02:39 PM
लवकर मंत्रिमंडळ विस्तार करून दाखवा, त्यानंतर…, ठाकरे गटाच्या नेत्याचं शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज
16 MLAs Disqualified | शिवसेनेच्या ‘त्या’ १६ आमदारांबाबत अजित पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…