कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर शेतककरी बरसले; म्हणाले…
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिकमध्ये अवकाळी नुकसानीचा दौरा केला. मात्र रात्रीच्या अंधारात सत्तारांनी नेमकं काय पाहिलं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला
निफाड (नाशिक) : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केलं आहे. अधिवेशन संपताच राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी दौरे सुरू केले आहेत. यावेळी सत्तार यांनी आज नाशिकमध्ये अवकाळी नुकसानीचा दौरा केला. मात्र यानंतर येथील शेतकरी संतापल्याचे समोर येत आहे. तसेत शेतकऱ्यांनी रात्रीचं मत्र्यांनी काय पाहिलं असा सवाल देखिल केला आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिकमध्ये अवकाळी नुकसानीचा दौरा केला. मात्र रात्रीच्या अंधारात सत्तारांनी नेमकं काय पाहिलं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला. एवढेच नाही तर अब्दुल सत्तार यांची पाठ वळताच शेतकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. द्राक्षांचं नुकसान त्यांनी पाहिलं. पण कांद्याचं काय? शेतकऱ्यांचं ऐकलं गेलं नाही. फक्त शेतकऱ्याला दाबण्याचा प्रयत्न झाला असेही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. तर संतप्त शेतकऱ्यांनी 50 खोके एकदम ओकेच्या घोषणाच सुरू केल्या.