पवारांनीच विरोधकांचा मुद्द्याला दिली बगल; डिग्रीपेक्षा इतर प्रश्न…

| Updated on: Apr 10, 2023 | 2:37 PM

शरद पवार यांनी, आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत, तुमची पदवी काय आहे, माझी पदवी काय आहे?, हा राजकीय मु्द्दा आहे का? बेरोजगारी, कायदा सुवस्था, महागाई असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नावर केंद्र सरकारला जाब विचारला पाहिजे, असं म्हटलं आहे.

नाशिक : सध्या राज्यात अवकाळी, बेरोजगारी आणि इतर विषयांवरच चर्चा होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरूनही विरोधकांनी सडकून टीका केली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या मुद्यांवरुन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उठवत ती जनतेच्या समोर ठेवायाला काय अडचण असल्याचे विचारले आहे. याचदरम्यान नाशिकमध्ये मात्र यावरून मविआच्या घटक पक्षातच एकमत नसल्याचे दिसत आहे. मोदी आणि भाजपला कोंडीत पकडण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना राष्ट्रवादीकडून सुरूंग लावण्याचे काम झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी, डिग्रीच्या वादाऐवजी लोकांशी निगडीत प्रश्न गरजेचं असल्याचं म्हटलं. शरद पवार यांनी, आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत, तुमची पदवी काय आहे, माझी पदवी काय आहे?, हा राजकीय मु्द्दा आहे का? बेरोजगारी, कायदा सुवस्था, महागाई असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नावर केंद्र सरकारला जाब विचारला पाहिजे, असं म्हटलं आहे.

Published on: Apr 10, 2023 02:30 PM
कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकला चलो रे चा नारा, कर्नाटकात 50 लढवणार?
जगदीश मुळीक यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा भावी खासदार म्हणून उल्लेख