उपमहाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पुढचं ध्येय काय? महेंद्र गायकवाडने आपली महत्वकांक्षा सांगितली…

| Updated on: Jan 25, 2023 | 9:42 AM

उपमहाराष्ट्र केसरी झाल्यानंतर आता पुढची अपेक्षा काय? महेंद्र गायकवाडची पुढची महत्वकांक्षा काय? पाहा...

नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. यात महेंद्र गायकवाड उपविजेता ठरला. उपमहाराष्ट्र केसरी झाल्यानंतर महेंद्र गायकवाडची आता पुढची महत्वकांक्षा काय?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचं उत्तर महेंद्र गायकवाडने दिलं आहे. “महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली आहे आता मी ऑलम्पिकसाठी तयारी करत आहे. मी मागील सहा वर्षापासून पैलवानकीची तयारी करत आहे. माझं वय वीस आहे. त्यामुळे मी यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ऑलम्पिकसाठी खेळण्याची माझी इच्छा आहे, असं महेंद्र गायकवाडनं सांगितलं.

Published on: Jan 25, 2023 09:42 AM
पोटनिवडणूक बिनविरोधाची परंपरा जपावी, मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; यासह जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
घातपात की आत्महत्या? भीमा नदीत आढळले एकाच कुटुंबातील ७ मृतदेह, ३ चिमुकल्यांचाही समावेश