‘अरे यार देवेंद्रजी का भी सपोर्ट नही… अब, म्हणत उर्फीने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर उर्फी ट्वीट शेअर करुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे ओळखली जाते. ती तिच्या फॅशन आणि स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. मध्यंतरी तिचा एअर पोर्टवरील एक व्हीडिओ व्हायरल झाला. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ उर्फी विरोधात उतरल्या. त्यानंतर उर्फी विरूद्ध चित्रा वाघ हा वाद पेटतच आहे.
आता पुन्हा एकदा अतरंगी उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचले आहे. तसेच सोशल मीडियावर ट्वीट करत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. उर्फी ट्वीट शेअर करुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत आहे. नुकतेच उर्फीनं एक ट्वीट शेअर केलं. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला वावगं काहीही वाटत नाही, अशी प्रतिक्रिया अमृता यांनी दिली आहे.
यानंतर उर्फीने ट्वीट करत, अरे यार देवेंद्रजी का भी सपोर्ट नही असं म्हणत आता काय असा सवाल चित्रा वाघ यांना केला आहे.