आग्रा किल्ल्यात शिवजयंतीला परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतप्त; औरंगाबादच्या क्रांती चौकात आंदोलन
आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंतीला परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतप्त झालेत. संतप्त शिवप्रेमींनी औरंगाबादच्या क्रांती चौकात आंदोलन केलं. पाहा...
औरंगाबाद : आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंतीला परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतप्त झालेत. संतप्त शिवप्रेमींनी औरंगाबादच्या क्रांती चौकात आंदोलन केलं. पुरातत्व विभागाच्या पक्षपाती निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या 19 तारखेला आग्र्याच्या ऐतिहासीक किल्ल्यामध्ये शिवजयंतीच्या भव्य कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे आणि आर आर पाटील फाउंडेशन अध्यक्ष विनोद पाटील यांनी नियोजन केलं होतं. कार्यक्रमासाठी पुरातत्व विभागाकडे रितसर परवानगीही मागितली होती. मात्र कोणतही कारण न देता परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याविरोधात अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Published on: Feb 03, 2023 01:20 PM