भगतसिंग कोश्यारींमुळे आमच्या राज्याचं नाव बदनाम!; उत्तराखंडच्या नेत्याचा थेट आरोप

| Updated on: Feb 22, 2023 | 8:17 AM

भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून पायउतार झालेत. त्यानंतर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...

देहरादून : भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून पायउतार झालेत. त्यानंतर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भगतसिंग कोश्यारींमुळे उत्तराखंडचं नाव बदनाम झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. “आमचा भाजपच्या नेत्यांना सवाल आहे की, दोन राज्यपालांचा कार्यकाल पुर्ण झालेला नसतानाही त्यांना पदमुक्त का केलं गेलं? भगत सिंह कोश्यारी आणि रमेश कोठारी यांचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांन पदमुक्त का केलं? यामुळे उत्तराखंडचं नाव बदनाम झालं”, असं रावत म्हणालेत. भगतसिंह कोश्यारी त्यांच्या चुकीच्या वक्तव्यांमुळे भाजपसाठी ओझं बनले होते. म्हणून त्यांना पदावरून हटवण्यात आलं, असंही रावत म्हणाले.

Published on: Feb 22, 2023 07:45 AM
रहिवाशांना त्रास देऊन माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न, कुणी केली शिंदे-भाजप सरकारवर टीका
आधी श्रीकांत शिंदेंविरोधात राऊतांची तक्रार; आता राऊतांविरोधात मानहानीचा दावा