मनसे नेता म्हणतोय, “आमचा विश्वास पक्का… विधानसभा लढवणार, निवडणूनही येणार!”
राज ठाकरे आजपासून दोन दिवसीय कोकण दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त मनसे नेत्यांनी कोकणात जय्यत तयारीही करण्यात आली आहे. दरम्यान मनसे नेते वैभव खेडेकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
रत्नागिरी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली आहे. राज ठाकरे आजपासून दोन दिवसीय कोकण दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त मनसे नेत्यांनी कोकणात जय्यत तयारीही करण्यात आली आहे. दरम्यान मनसे नेते वैभव खेडेकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “आगामी विधानसभेच्या सर्व जागा मनसे लढवणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच कार्यकर्त्यांच्या भेटी वाढल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या विचारधारेला छेद पाडून राजकारण सुरु आहे. 2024 मध्ये मनसेला निश्चित यश मिळेल आणि आम्ही सत्तेमध्ये येऊ.”
Published on: Jul 13, 2023 02:40 PM