“ईडीच्या भीतीने राणे भाजपमध्ये”, वैभव नाईक यांची जहरी टीका; म्हणाले, “नितेश राणे यांनी मंत्रिपदाची…”
भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गट राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असून घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याचा टोला लगावला होता. यावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सिंधुदुर्ग: भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे गट राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असून घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याचा टोला लगावला होता. यावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “नितेश राणे यांनी स्वतःचा पक्ष किती दिवसात विलीन केला, याचा इतिहास पाहून नंतरच शिवसेनेवर टीका करावी”, असा उपरोधक टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे. “त्यासोबत नितेश राणे यांनी ईडीच्या भीतीने आपला पक्ष भाजपात विलीन केला. त्यांनी आपल्या मंत्रिपदाची चिंता करावी.तसेच वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची लोकप्रियता समजेल”, असा टोला देखील लगावला.
Published on: May 30, 2023 10:46 AM