“स्वाभिमान गुंडाळून नितेश राणे यांचा भाजपमध्ये प्रवेश”, ठाकरे गटाचा हल्लाबोल
ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी संजय राऊत यांना ऑफर दिली आहे, असा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आरोप केला होता. यावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांना ऑफर आल्यामुळे त्यांनी पक्ष बदलले आहेत, राणे कुटुंब त्यातलं एक उदाहरण आह.
मुंबई : ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी संजय राऊत यांना ऑफर दिली आहे, असा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आरोप केला होता. यावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांना ऑफर आल्यामुळे त्यांनी पक्ष बदलले आहेत, राणे कुटुंब त्यातलं एक उदाहरण आहे. त्यांना ईडी, मंत्रीपदाच्या ऑफर आल्या आहेत, म्हणून त्यांनी पक्ष बदलले आहेत. ते शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये गेले, आणि त्यांच्याच कार्यकाळात काँग्रेसला पराभव चाखावा लागला, हा सुद्धा इतिहास आहे. वडिलांनी जो पक्ष काढला, त्या पक्षातून नितेश राणेंनी उमेदवारी घेतली का? त्यांचा वडिलांवर विश्वास नाही का ? नितेश राणे यांनी स्वतःचा स्वाभिमान गुंडाळून भाजपमध्ये प्रवेश केला, अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे.नितेश राणे यांनी भाजपमध्ये आपलं नेतृत्व काय आहे हे ओळखाव, आज रवींद्र चव्हाण यांच्यासारखे नेते कोकणात नेतृत्व करत आहेत, ही राणे यांच्यासाठी शोकांतिका असल्याचंही वैभव नाईक म्हणाले.