मोठी बातमी! आगामी लोकसभा निवडणुकीबाबत ‘या’ नेत्याचा मोठा दावा, तर भाजपवर मोठा आरोप; काय म्हणाला,
याच्याआधी देखील त्यांनी असा दावा करताना, विरोधकांना निवडणूक लढवण्यासाठी निधीच मिळू नये म्हणून भाजपाने नोटंबदीचा निर्णय घेतला आहे, असा आरोप केला होता. तर राजकीय पक्षांनी गाफील राहू नये, असा इशारा दिला होता. तर लोकसभा निवडणुकीबाबत भाकीत करताना त्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच लागतील असा दावा केला होता.
लातूर : आगामी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणूकीवरून सध्या सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. ही निवडणूक येत्या वर्षात लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष लोकसभा मतदारसंघानिहाय आढावा बैठका घेताना दिसत आहेत. तर नव्या जुन्यांची सांगड घालत चेहरा ठरवत आहेत. याचदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकींबाबत मोठा दावा केला आहे. याच्याआधी देखील त्यांनी असा दावा करताना, विरोधकांना निवडणूक लढवण्यासाठी निधीच मिळू नये म्हणून भाजपाने नोटंबदीचा निर्णय घेतला आहे, असा आरोप केला होता. तर राजकीय पक्षांनी गाफील राहू नये, असा इशारा दिला होता. तर लोकसभा निवडणुकीबाबत भाकीत करताना त्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच लागतील असा दावा केला होता. आता पुन्हा हाच दावा त्यांनी लातूर येथे केला आहे. यावेळी त्यांनी लोकसभेच्या निवडणूक ऑक्टोबर महिन्यातच लागल्या तर नवल वाटू देऊ नका असंही म्हटलं आहे. तर भाजप भितीचे वातावरण तयार करून निवडणुका जिंकू पाहत असल्याची टीका त्यांनी केली आहे.