Lok Sabha Elections : देशात मध्यावधी? निवडणुका महिना-दीड महिन्यात होतील? आंबेडकर यांचा दावा

| Updated on: Aug 10, 2023 | 1:56 PM

याचपार्श्वभूमिवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सध्या केंद्र सरकारचे अधिवेशन सुरू असून ते मणिपूर हिंसाचार आणि विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर जागत आहे. याचदरम्यान राज्यात देखील लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर जोरदार तयारी पाहायला मिळत आहे.

औरंगाबाद, 10 ऑगस्ट 2023 | राज्यासह देशातील काही राज्यात पुढच्या वर्षभरात लोकसभेच्या निवडणूका लागतील. याचपार्श्वभूमिवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सध्या केंद्र सरकारचे अधिवेशन सुरू असून ते मणिपूर हिंसाचार आणि विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर जागत आहे. याचदरम्यान राज्यात देखील लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. भाजपकडून एनडीएच्या बैठका सुरू असून इंडिया आघाडीकडून देखील विरोधी पक्षांच्या बैठकांना जोर आला आहे. याचदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देशात मध्यावधी लागतील असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आता खळबळ उडालेली आहे. तर त्यावरून त्यांच्यावर टीका देखील होत आहे. पाहा काय म्हटंल आहे आंबेडकर यांनी…. Lok Sabha Elections

Published on: Aug 10, 2023 01:56 PM
‘कोण महाविकास आघाडी? मविआसोबत देणे घेणे नाही’; आंबेडकर यांचे मोठे विधान
‘सोमय्यांचा व्हिडिओ आला त्याच्यावर आधी यांनी बोलावं’; भाजपवर शिवसेना नेत्याचा हल्लाबोल