प्रकाश आंबेडकर त्यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये ; बावनकुळे यांच प्रत्युत्तर

| Updated on: Mar 16, 2023 | 4:17 PM

प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये, तुम्ही जर पाहत असाल तर बऱ्याच प्रमाणामध्ये मुस्लिम वर्ग आता भाजपकडे वळालेला असल्याचे बावनकुळे म्हणाले.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. तसेच मुस्लिम समाज भाजप आणि मोदींच्या मागे नाही, तो यांना मतदान करणार नाही, असे ते म्हणाले. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिल आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये, तुम्ही जर पाहत असाल तर बऱ्याच प्रमाणामध्ये मुस्लिम वर्ग आता भाजपकडे वळालेला असल्याचे बावनकुळे म्हणाले. भविष्यात देखील भाजप सोबतच हा मुस्लिम वर्ग असेल. कारण त्यांना जी काही आश्वासन दिली होती ती पूर्ण करण्यामध्ये हा विकास आघाडी सपशेल फोल ठरल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर केवळ बोलायचं म्हणून त्यांनी विधान केलेला आहे. पण या विधानामध्ये काही तथ्य नाहीये आमच्या स्पष्ट मत आहे की येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम समाज हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मतदान करेल.

Published on: Mar 16, 2023 03:42 PM
राज्याचे उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? शिंदे की फडणवीस? संजय राऊत यांनी कुणाला केलं सिलेक्ट?
किसानांची खिंड लढवण्यासाठी लहानगा ‘बाजी’ लाल वादळात सहभागी, बघा काय म्हणाला…