the burning train! भोपाळहून नवी दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारतला आग
तर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. याबाबात मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) सकाळी कुरवई स्थानकाजवळील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या C14 बोगीमध्ये बॅटरीला आग लागली.
नवी दिल्ली, 16 जुलै 2023 | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या बोगीला आग लागल्याचे समोर आले आहे. निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या C14 बोगीमध्ये बॅटरीला आग लागल्याने बिना रेल्वे स्थानकापूर्वी कुरवाई केथोरा येथे गाडी थांबवण्यात आली आणि प्रवासी सुखरूप उतरवण्यात आले. तर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. याबाबात मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) सकाळी कुरवई स्थानकाजवळील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या C14 बोगीमध्ये बॅटरीला आग लागली. यामुळे बोगीमध्ये आग लागली. याची माहिती मिळताच एक्स्प्रेस बिना रेल्वे स्थानकापूर्वी थांबविण्यात आली. तर प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले. तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना बीनासमोर ही घटना घडली.
Published on: Jul 17, 2023 12:32 PM