Video : ज्ञानवापी मशिद प्रकरणी वाराणासी कोर्टात सुनावणी पूर्ण, 4 वाजता फैसला होणार

| Updated on: May 17, 2022 | 3:43 PM

ज्ञानवापी मशिदीशी (Gyanvapi Masjid) संबंधित मुस्लिम पक्षकारांनी  (muslim) केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. आजच दुपारी 4 वाजता त्यावर निर्णय येणार आहे. तसेच ज्ञानवापीचा सर्व्हे रिपोर्ट तयार करण्यासाठी चीफ कमिश्नर विशाल प्रताप सिंह यांच्या टीमला दोन दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. कोर्टात सरकारी वकिलांनी एक याचिका दाखल केली असून त्यात आणखी एका कोर्ट कमिश्नरची मागणी केली आहे. त्याचबरोबर […]

ज्ञानवापी मशिदीशी (Gyanvapi Masjid) संबंधित मुस्लिम पक्षकारांनी  (muslim) केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. आजच दुपारी 4 वाजता त्यावर निर्णय येणार आहे. तसेच ज्ञानवापीचा सर्व्हे रिपोर्ट तयार करण्यासाठी चीफ कमिश्नर विशाल प्रताप सिंह यांच्या टीमला दोन दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. कोर्टात सरकारी वकिलांनी एक याचिका दाखल केली असून त्यात आणखी एका कोर्ट कमिश्नरची मागणी केली आहे. त्याचबरोबर वजूखाना आणि शौचालयही दुसरीकडे शिफ्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. असिस्टंटं कोर्ट कमिश्नर अजय प्रताप सिंह यांनी 50 टक्केच रिपोर्ट पूर्ण झाल्याची माहिती कोर्टाला दिली होती. तसेच हा रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी अजून दोन दिवसांचा अवधी देण्याची मागणी केली होती. दुसरीकडे ज्ञानवापी मशिदीची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात  (supreme court)   पोहोचली आहे. मुस्लिम पक्षकारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. अंजुमन इंजतामिया मशीद कमिटीने सर्व्हेच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच सर्व्हेचा आदेश 1991च्या प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्टचं उल्लंघन करणारा असल्याचं म्हटलं होतं.

Published on: May 17, 2022 03:43 PM
ज्ञानवापी मशिदीशी संबंधित वाराणासी कोर्टात सुनावणी पूर्ण, 4 वाजता फैसला
Video : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करणार-दिलीप वळसे पाटील