कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! पुण्याहून कोकणात जाणारा ‘हा’ घाट होणार खुला
जुलै महिन्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे राज्यातील अनेक मार्गांवर पाणी आले होते. तर अनेक घाटमाथ्यावर आणि घाटात पावसाचा जोर कायम होता. ज्यामुळे तेथील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता. तर दरड कोळण्याच्या घटना समोर येत होत्या.
पुणे : 24 ऑगस्ट 2023 | सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही ठिकाणी दोन दिवसापासून पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. मात्र जुलै महिन्यात पडणाऱ्या सततच्या आणि मुसळधार पावसामुळे काही ठिकणी घाटातील सस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. तर अनेकांना दुसरा पर्याय शोधावा लागत होता. अशीच काहीसी अवस्था पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावरील वाहनधारकांची झाली होती. वरंधा घाटात पावसामुळे दरड कोसळण्याची भीती असल्यानं 30 सप्टेंबरपर्यंत घाट जड वाहनांसाठी तर हवामान खात्याचा रेड ऑरेंज अलर्ट असताना सर्व प्रकारच्या वाहनानांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र आता पावसाचा जोर ओसरला असल्याने तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर वरंधा घाट 25 ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलाय. तर पुढील काळात हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार अंदाज पाहून वाहतुकीबाबत सुधारित अधिसूचना काढण्यात येतील असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.