SEBI ने दिली सूट, अदानी करतोय लूट,आणि ED बसलीय चूप, ईडी कार्यालयावर कॉंग्रेसचा धावा
कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी ईडी कार्यालयावर मोर्चा काढला होता. परंतू पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उचलबांगडी करण्यात आली.
‘मोदी-अदानी भाई-भाई, मोदी-अदानी हाय-हाय, अशा घोषणा देत अदानी विरोधात ईडी कार्यालयावर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी मोर्चा काढला. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणा बाजी येथे केली. त्यानंतर पोलिसांनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक करीत पोलिसांच्या व्हॅनमध्ये कोंबले. या आंदोलनात कॉंग्रेसचे कार्यकर्ते सरकार चोर आहे अशाही घोषणा देत होती. हिंडेनबर्ग या अमेरिकन गुंतवणूकदार कंपनीने काही वर्षांपूर्वी अदानी यांच्यावर शेअर बाजारात हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदीय संयुक्त समितीची ( जेसीपी) मागणी केली होती. परंतू सुप्रीम कोर्टाने देखील ही मागणी मान्य न करता सरकारच्या बाजूने निकाल दिला होता. या प्रकरणात सरकारने हिंडेनबर्गला चौकशीची नोटिस पाठविली होती. त्यानंतर हिंडेनबर्ग या गुंतवणूवक कंपनीने अखेर सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यावर आरोप केले. माधवी या अदानी प्रकरणाची चौकशी करणार होत्या. परंतू अदानीच्या परदेशी कंपन्यात माधवी यांचे शेअर असल्याने त्यांनी अदानींना क्लीनचिट दिल्याचा आरोप केला. या प्रकरणात अदानीवर ई़डी कारवाई का करत नाही असा आरोप कॉंग्रेसने करीत आज आंदोलन केले.