Varsha Gaikwad | बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे – वर्षा गायकवाड

| Updated on: Jan 30, 2022 | 4:48 PM

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केलेल्या जहरी टिकेवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोणीही बोलताना तारतम्या बाळगलं पाहिजे, एक परंपरा पाळली पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. आज आपण महात्मा गांधीं(Mahatma Gandhi)ची पुण्यतिथी साजरी करत आहोत. अशावेळी अशाप्रकारची एकमेकांवर चिखलफेक करण्याऐवजी एक चांगला विचार आत्मसात करावा, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केलेल्या जहरी टिकेवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोणीही बोलताना तारतम्या बाळगलं पाहिजे, एक परंपरा पाळली पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. आज आपण महात्मा गांधीं(Mahatma Gandhi)ची पुण्यतिथी साजरी करत आहोत. अशावेळी अशाप्रकारची एकमेकांवर चिखलफेक करण्याऐवजी एक चांगला विचार आत्मसात करावा, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. अमृता फडणवीसांनी एक जळजळीत ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे. नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले अशा आशयचे जळजळीत ट्विट अमृता फडणवीसांकडून करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अमृता फडणवीसांनी एक प्रश्नपत्रिका दिली आहे. थोडक्यात उत्तर द्यावे 50 मार्क्स, असे प्रश्नपत्रिकेला हेडर देण्यात आलं आहे, त्यावरूनच वर्षा गायकवाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय.

BUDGET 2022 JOB SEEKER : विपुलच्या नोकरीच्या शोध संपेल ? काय आहेत नवपदवीधारकांच्या बजेटकडून अपेक्षा?
Aurangabad मधील ते वादग्रस्त बॅनर फाडलं