TET परीक्षेतला घोटाळा BJPच्या काळातला, Varsha Gaikwad यांची टीका

| Updated on: Jan 28, 2022 | 5:56 PM

टीईटी (TET) परीक्षेतला घोटाळा हा भाजपा सरकार(BJP Government) च्या काळातला असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलंय. करारनामा 2017 सालीच झाला होता, परीक्षा बोर्ड हे स्वायत्त आहे, त्याच्या स्वायत्ततेबद्दल काय निर्णय घ्यायचा हे ठरवण्यासाठी समिती गठीत केली आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

टीईटी (TET) परीक्षेतला घोटाळा हा भाजपा सरकार(BJP Government) च्या काळातला असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलंय. करारनामा 2017 सालीच झाला होता, परीक्षा बोर्ड हे स्वायत्त आहे, त्याच्या स्वायत्ततेबद्दल काय निर्णय घ्यायचा हे ठरवण्यासाठी समिती गठीत केली आहे. ज्याच्यावर आरोप आहे, त्याचं निलंबन केलं गेलं आहे. कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्याचा, पाठीशी घालण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही. बोर्ड स्वायत्त आहे. त्या माध्यमातून परीक्षा घेतली जाते. त्यासंदर्भातली चौकशी समिती आम्ही लावली आहे. येणाऱ्या काळात यामध्ये बदल करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. स्वायत्त असल्याने जे काही निर्णय होतात, ते त्यांच्या त्यांच्या अधिकाऱ्यांच्या स्तरावर होत असतात. यासर्वच प्रकरणामध्ये आम्ही तपासणी करत आहोत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Nana Patole यांच्या पत्त्यावर मनोरुग्णांना दिलं जाणारं औषध कुणी पाठवलं?
अभिनंदन लोकशाही वाचली, Urmila Matondkar यांचा Devendra Fadnavis यांना टोला