Video | पुण्यात आपलाच हातोडा चालणार, वसंत मोरे यांना आत्मविश्वास

| Updated on: Mar 15, 2024 | 4:00 PM

मनसेला नुकतीच सोडचिट्टी देणारे पुण्यातील नेते वसंत मोरे यांचा विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याचा सिलसिला आजही सुरुच होता. आज त्यांनी मुंबईतील दैनिक सामना कार्यालयात जाऊन उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. आपण पुणे लोकसभेसाठी इच्छुक असून त्यासाठी सर्व नेत्यांना भेटत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई | 15 मार्च 2024 : गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या वसंत मोरे यांनी अखेर मनसेला सोडचिट्टी दिली आहे.त्यानंतर त्यांनी पुण्याच्या स्थानिक कॉंग्रेस नेत्यांशी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. आज वसंत मोरे यांनी दैनिक सामना कार्यालयात जाऊन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की आपण गेले काही दिवस घटक पक्षांच्या नेत्यांना भेटत आहोत. पुण लोकसभा ही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याने आपण बाळासाहेब थोरात यांनी भेटल्याचे त्यांनी सांगितले. काल त्यांनी पुण्यात शरद पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. कोणत्याही पक्षाकडून जरी तिकीट मिळाले नाही तरी आपण पुणे लोकसभा निवडणूक लढविणारच, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुण्यात आपला हातोडा चालणारच अशा आशावाद वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Mar 15, 2024 03:59 PM
शिंदे गटाचे हे 10 आमदार पुन्हा उद्धव ठाकरे गटात परतणार?, या व्यक्तीने केला दावा
शरद पवार यांची भेट घेतली का ? काय म्हणाले महादेव जानकर