समाजात तेढ निर्माण होईल असं काम नको

| Updated on: Apr 10, 2022 | 10:13 AM

समाजात दुफळी निर्माण होईल, वसंत मोरे जिंदाबाद, राज ठाकरे झिंदाबाद या प्रकारच्या घोषणांनी मला दुःख झालं असल्याचे मत पुण्याचे नगरसेवक आणि मनसे जिल्हाध्यक्ष यांनी मांडले.

समाजात दुफळी निर्माण होईल, वसंत मोरे जिंदाबाद, राज ठाकरे झिंदाबाद या प्रकारच्या घोषणांनी मला दुःख झालं असल्याचे मत पुण्याचे नगरसेवक आणि मनसे जिल्हाध्यक्ष यांनी मांडले. माझ्यासाठी राज ठाकरे म्हणजे आयुष्यभर जिंदाबाद राहतील आणि आहेत. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी अशा घोषणा देऊन नये असे आवाहनही वसंत मोरे यांनी केले. आपल्या कतृत्वाने समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा, वागणूक टाळण्याचे काम कार्यकर्त्यांनी करु नये असेही आवाहन त्यांनी केले. माझ्यासाठी राज ठाकरेंच्या नावाने दिलेल्या मुर्दाबादच्या घोषणा म्हणजे दुःखद घटना असल्याचेही त्यांनी सांगितले.  यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना हात जोडून समाजात तेढ निर्माण होईल असं काही करु नका असंही त्यांनी सांगितले.

माथी भडकावण्याची कामं सुरु आहेत
रामनवमीनिमित्त शिवसेना भवनसमोर मनसेकडून हनुमान चालीसा