Sudhir Mungantiwar : वेदांता, फॉक्सकॉनवरून सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसला टोला, ये अंदर की बात हैं क्या?

| Updated on: Sep 14, 2022 | 7:44 PM

राज्याचं नुकसान व्हावं, अशी सरकारची भावना कधीही राहणार नाही. गुजरातसोबत संबंध जोडणं योग्य नसल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

टाटा समूहाच्या माध्यमातून नॅनो गुजरातमध्ये गेली. तेव्हा काँग्रेसची सरकार होती. याचा अर्थ ये अंतर की बात हैं. काँग्रेस गुजरात के साथ हैं, असा होतो का, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला. विरोधी पक्षानं वेदांता प्रकल्पाबाबत चर्चा आयोजित करावी. उद्योग महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक घटनेला राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघणं योग्य नव्हे. दोन्ही बाजूनं ढोल वाजविण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असंही ते म्हणाले. राज्याचं नुकसान व्हावं, अशी सरकारची भावना कधीही राहणार नाही. गुजरातसोबत संबंध जोडणं योग्य नसल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

Published on: Sep 14, 2022 07:42 PM
महाविकास आघाडीनं राज्यात प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले, अजित पवार यांचे स्पष्टीकरण
Bachchu Kadu | ‘गुन्हा कधी दाखल झाला माहिती नाही’-बच्चू कडू