वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय? काँग्रेस नेत्याचे सांगितलं कारण
महाविकास आघाडीत एकजूट कायम ठेवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरु असतानाच राज्यात अजित पवार यांच्यावरून अनेक चर्चांना उत आला आहे. याचदरम्यान वेणुगोपाल-ठाकरे यांच्या भेटीला विशेष राजकीय महत्त्व आहे
नागपूर : वीर सावरकरांच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यावरून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल हे ठाकरे यांची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडीत एकजूट कायम ठेवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरु असतानाच राज्यात अजित पवार यांच्यावरून अनेक चर्चांना उत आला आहे. याचदरम्यान वेणुगोपाल-ठाकरे यांच्या भेटीला विशेष राजकीय महत्त्व आहे. तर वेणुगोपाल-ठाकरे यांची भेट मतभेद दुर करण्यासह इतर कारणांवर होत आहे का? जागा वाटपावरून होत आहे का या प्रश्नावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे. त्यांनी, निवडणूका तर आहेतच पण दोन्ही पक्षात चर्चा व्हावी, आघाडी मजबूत रहावी हाच उद्देश या भेटी मागचा आहे. जागा वाटपाचा विषय असेल असेस मला वाटत नसल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.