टोमॅटोनंतर लसूणचे दर 200 रुपये किलो; मुसळधार पावसाचा भाजीपाल्याला फटका!
जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेकांचं जीवनल विस्कळीत झालं आहे.आता जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी या पावसाचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे.
मुंबई, 5 ऑगस्ट 2023 | जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवसात राज्यात जोरदार पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे अनेकांचं जीवनल विस्कळीत झालं आहे.आता जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी या पावसाचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबई मध्ये भाज्यांच्या दरावर झाला आहे. मुंबईत काही भाज्यांचे दर हे वाढले आहेत, तर काही भाज्यांचे दर कमी दर कमी झाले आहेत. मुंबईत भाज्यांचे दर वर- खाली असले तरी लसूणचे दर गगनाला भिडले आहेत.मागच्या आठवड्यात लसूण 100 रुपये प्रति किलो होती, आता लसूण 180 ते 200 रुपये किलो झाली आहे. इतर भाज्यांचे दर कितीने वाढले आणि घटले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Aug 05, 2023 11:25 AM