‘आदिती तटकरे यांच्या बापाच्या पापांमुळे…,’ शिवसेना आमदाराची खोचक टीका

| Updated on: Nov 27, 2024 | 7:37 PM

कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांच्या खडाजंगी उडाली आहे. थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यास आदिती तटकरे यांनी तेवढ्याच खोचक शब्दात उत्तर दिले आहे.

कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघातील ननिर्वाचित आमदारा महेंद्र थोरवे यांनी महायुतीतील घटक पक्षच्या आदिती तटकरे यांच्या बापाच्या पापांमुळे आपले मताधिक्य घटल्याची टीका केली आहे. त्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत असले तर आतमध्ये धुसफूस सुरुच असल्याचे स्पष्ट झाले आहे. महेंद्र थोरवे यांनी अतिशय कठोर शब्दात टीका केल्यानंतर आदिती तटकरे यांनी तेखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलेले आहे. आदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवे हे काटावर वाचलेले आहेत त्यांना त्यांचा त्यांचा मतदार संघ सांभाळावा.त्यांनी यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ द्यायचे नसते उलट नम्रतेने त्याचा स्वीकार करायचा असतो. कोण कुठला मंत्री होणार हे आमचे वरिष्ठ नेते ठरवत असतात हे कुठला स्थानिक आमदार ठरवत नाही. ते काटावर आले, जरा इकडे तिकडे झाले असते तर पडले असते असे प्रत्युत्तर आदिती तटकरे यांनी दिले आहे. तर महेंद्र थोरवे यांनी आपण काटावर आलो नसून पाच हजार मतांनी निवडून आल्याचे म्हटले आहे.

Published on: Nov 27, 2024 07:36 PM
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले, दीपक कसेरकर यांनी केले कौतूक
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?