Special Report | राणा दाम्पत्यावरुन राणे-राऊतांमध्ये शाब्दिक युद्ध
सत्तेची परवा आम्हाला नाही, तुम्हाला असेल. स्वतःची हिंमत नाही म्हणून श्रीखंडीच्या आड हल्ले करतात त्यांचा लक्षभेद केला जाईल. महाभारत पुन्हा घडवण्याचं आमच्यात ताकद आहे. अमरावतीला मी जाणार, पाहतो अमरावती शिवसेनेचं आहे की आणखी कुणाचं आहे. त्या कशा निवडून येतात ते पाहू, असे राऊत म्हणाले.
नागपूर : खासदार बाई यांचा हिंदुत्वाचा संबंध काय? अयोध्या आंदोलन, श्रीरामचं नाव घ्यायला यांचा विरोध होता. शिवसेनेचं हिंदुत्व हे असा घंटाधारीचं नाही, आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये. यांनी कृपया सेनेच्या वाट्याला जाऊ नका, मातोश्रीशी खेळू नका, 20 फूट खाली गाडले जाल. तुमच्या उकळीला दाबण्याची क्षमता आहे. मी नागपूरात आहे, आणि उद्वधजींनी मला नागपुरात रहायला सांगितले. राष्ट्रपती राजवट कशी लागते हे आम्हाला माहित आहे. पहाटे शपथवीधी घेऊन राष्ट्रपती राजवट उठवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. कायदा कुणाला शिकवायच्या असेल तर राज्यपाल यांना शिकवा. या खासदार बाईंना केंद्राची सुरक्षा का मिळाली? हे खाजगीत सांगू. बोगस प्रमाणपत्र घेऊन ही बाईस लोकसभा निवडणूक लढते. सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. बोगस प्रमाणपत्रावर निवडूण आलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. मातोश्रीची रेकी करण्याचा काल प्रयत्न झाला. तेव्हा शिवसैनीक चाल करुन गेले हा कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न नाही आमच्या स्वाभिमानाचा आहे. सत्तेची परवा आम्हाला नाही, तुम्हाला असेल. स्वतःची हिंमत नाही म्हणून श्रीखंडीच्या आड हल्ले करतात त्यांचा लक्षभेद केला जाईल. महाभारत पुन्हा घडवण्याचं आमच्यात ताकद आहे. अमरावतीला मी जाणार, पाहतो अमरावती शिवसेनेचं आहे की आणखी कुणाचं आहे. त्या कशा निवडून येतात ते पाहू, असे राऊत म्हणाले.