Video | कर्तव्यपथावर भारताच्या समारिक शक्ती आणि सांस्कृतिक विविधतेचं दर्शन
75 व्या प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील कर्तव्य पथावर संचलन करण्यात आले. या सोहळ्याला प्रथमच 1500 शेतकऱ्यांना आमंत्रण देण्यात आले होते. या सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या वेळी सार्वभौम भारताच्या सामरिक शक्ती आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन जगाला झाले.
नवी दिल्ली | 26 जानेवारी 2024 : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्लीतील परेडमध्ये 1500 शेतकऱ्यांना पाहूणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्यात सैन्य दलाच्या तिन्हा दलाच्या सैनिकांनी परेडमध्ये सहभाग घेतला. त्यांचे शिस्तबद्ध संचलन पाहून देशवासियांचा ऊर अभिमानाने भरुन आला. यंदाच्या फ्रान्सच्या सैन्य दलाने देखील या परेडमध्ये सहभाग घेतला.
कर्तव्यपथावर भारताच्या सामरिक शक्ती आणि विविध संस्कृतीचे दर्शन झाले. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी फ्रान्सच्या सैन्य दलाने देखील परेडमध्ये सहभाग घेतला. या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुख या नात्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्य दलाची सलामी स्वीकारली. यावेळी देशातील विविध राज्याचे संस्कृती दर्शविणाऱ्या चित्र रथांचाही दर्शनही झाले.