Video: गजानन कीर्तीकर यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लीलाधर डाकेंच्या भेटीला

Video: गजानन कीर्तीकर यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लीलाधर डाकेंच्या भेटीला

| Updated on: Jul 28, 2022 | 11:55 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. बाळासाहेबांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली तेव्हापासून लीलाधर डाके हे शिवसेनेसोबत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल  शिवसेना खासदार आणि ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या गजानन किर्तीकरांची भेट घेतली होती. त्यानंतर ते आज सेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. बाळासाहेबांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली तेव्हापासून लीलाधर डाके हे शिवसेनेसोबत आहेत. त्याशिवाय शिवसेनेचे आणखी एक ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचीसुद्धा भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे कळते. आज संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास मनोहर जोशी यांची भेट मुख्यमंत्री घेऊ शकतात. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Jul 28, 2022 11:55 AM
“संजय राऊत बाहेर असले तर या सरकारला अडचणी येतील म्हणून…”- संजय राऊत
Video: वडार समाजाच्या विविध मागण्या घेऊन चौगुले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला