Video: मूळ विषयाला ‘डायव्हर्ट’ करण्यात भाजप ‘एक्सपर्ट’- नाना पटोले
राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे, त्यांच्यावर सर्वच स्थरातून टीका होत असल्याने लक्ष भरकटविण्याचे काम भाजप करत असल्याचे नाना पटोले म्हणले.
मूळ विषयाला डायव्हर्ट करण्यात भाजप एक्सपर्ट असल्याचा घणाघात काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केला. स्वतःचे पाप लपविण्यासाठी या प्रकारच्या कारवाया करणं काही नवीन नाही असेही आमदार पटोले म्हणाले. राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे, त्यांच्यावर सर्वच स्थरातून टीका होत असल्याने लक्ष भरकटविण्याचे काम भाजप करत असल्याचे नाना पटोले म्हणले. फोडा आणि राज्य करा ही भाजपची जुनी नीती आहे असेही ते यावेळी म्हणाले. याशिवाय सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांचाही राज्यपालांनी अपमान केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
Published on: Jul 31, 2022 02:07 PM