Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली मनोहर जोशी यांची भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची भेट घेतली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चा चांगल्याच रंगत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची भेट घेतली. काल शिवसेना खासदार आणि ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या गजानन किर्तीकरांची भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली होती . त्यानंतर त्यांनी आज सकाळी सेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेतली. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी डाके यांची भेट घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांनी सांगितले. त्याच वेळी ते आज संध्याकाळी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता त्यांनी भेट घेतली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चा चांगल्याच रंगत आहेत.
Published on: Jul 28, 2022 07:40 PM