Video: नागपूरात काँग्रेसचे टोल नाक्यावर आंदोलन, काय आहे नेमके प्रकरण?

Video: नागपूरात काँग्रेसचे टोल नाक्यावर आंदोलन, काय आहे नेमके प्रकरण?

| Updated on: Sep 01, 2022 | 11:20 AM

आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका सुरु होऊ देणार नाही अशी भूमिका आमदार राजू पावरे यांनी घेतली आहे.

नागपुरात काँग्रेसकडून टोलणाक्यवार आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस आमदार राजू पावरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन करून नागपूर जवळील टोलनाका काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंद केला आहे. टोलणाक्यवार स्थानिक तरुणांना रोजगार द्या तसेच टोल नाक्याच्या 20 किलोमीटर परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांना टोलमाफी  द्यावी अशी मागणी यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले होते. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका सुरु होऊ देणार नाही अशी भूमिका आमदार राजू पावरे यांनी घेतली आहे.

Published on: Sep 01, 2022 11:20 AM
इगतपुरी पूर्व भागात रात्री ढगफुटी सदृश पाऊस
Video: प्रत्येक पक्षाला ऊन-सावली असतेच, पंकजा मुंडे भाजप सोडणार नाही- महादेव जानकर