Video | ‘हवे तर भुजबळांना पोलीसांचे कपडे घाला….’, मनोज जरांगे यांनी काय केली मागणी

| Updated on: Feb 10, 2024 | 2:03 PM

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भुजबळ यांच्या नाशिक कार्यालयात त्यांना धमकी देणारे पत्र आले आहे. यावर पोलिस काय ते बघून घेतील, आपल्या धमक्या नव्या नाहीत. आपल्याला कितीही धमक्या आल्या तरी आपले विचार आणि आयडीयालॉजी आपण सोडणार नसल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर खरमरीत भाषेत टीका केली आहे.

मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आले आहे. नाशिक येथील कार्यालयात अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून धमकी दिली आहे. या प्रकरणात आपल्याला राजकीय जीवनात अनेकदा धमकी आलेल आणि हल्ले करण्याचा प्रयत्न झालेला आहे. या धमकीबाबत पोलिस काय ती कारवाई करतील असे त्यांनी म्हटले आहे. किती धमक्या आल्या तरी आपण आपली राजकीय भूमिका आणि आयडीयालॉजी बदलणार नाही असेही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ हे म्हातारे झाले आहेत, त्यांना कोण कशाला मारेल. कोणत्याही संघटनेचा माणूस त्यांना मारु शकत नाही. म्हाताऱ्या माणसावर माया करतात कोण त्यांना मारत नाही. अजूनही तेवढे संस्कार आहेत पुरोगामी महाराष्ट्रावर अजून. अशा भंगार विचाराच्या माणसाला कोण कशाला मारेल. त्यांचे तेच विचार करुन गपकन जातील. हवे तर सगळे पोलिस दल त्यांना द्या, पोलिसांची वर्दी त्यांना घाला असेही जरांगे यांनी म्हटले आहे. आपल्यावर सात वेळा घातपाताचा प्रकार घडला आहे. परंतू मी कधी आरड ओरड करत नाही असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

Published on: Feb 10, 2024 02:02 PM
Video | मनोज जरांगे यांचं तिसऱ्यांदा उपोषण सुरु, काय आहेत मागण्या पाहा
Video | ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी आहे काय ? उद्धव ठाकरे यांचा सवाल