Video: राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे अधिवेशन, 2024 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष महत्त्व
राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची फेरनियुक्ती कालच्या एका बैठकीत करण्यात आली, त्याची अधिकृत घोषणा देखील या अधिवेशनामध्ये होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था व्यासपीठावर केली गेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आज आठवे अधिवेशन आहे. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर हे अधिवेशन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह सर्वच पदाधीकारी या अधिवेशनाला उपस्थित आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची फेरनियुक्ती कालच्या एका बैठकीत करण्यात आली, त्याची अधिकृत घोषणा देखील या अधिवेशनामध्ये होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था व्यासपीठावर केली गेली आहे. तीन वर्षानंतर हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात 2024 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने या अधिवेशनाला मोठं महत्त्व आहे.
Published on: Sep 11, 2022 01:00 PM